बंद

    परिचय

    चंद्रपूर जिल्याचे विभाजन हॊऊन दिनांक २६.०८.१९८२ पासून गडचिरोली जिल्हा परिषद अस्तित्वात आली. याशिवाय परिषदेच्या अधिकार क्षेत्रातील ऐकूण १२(बारा) पंचायत समित्या आहेत. पंचायत समित्यांचे नावे अनुक्रमे १) गडचिरोली २) आरमोरी ३) कुरखेडा ४) धानोरा ५) चामोर्शी ६) अहेरी ७) एटापल्ली ८) सिरोंचा ९) भामरागड १०) मुलचेरा ११) कोरची आणि १२) देसाईगंज.

    जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात एकूण ४६७ ग्रामपंचायती असून ९६ स्वतंत्र ग्रामपंचायत व ३७१ गट ग्रामपंचायत आहेत. जिल्ह्यातील एकूण खेड्याची संख्या १,६८० आहे. एकूण लोकसंख्ये पैकी ३,७१,६९६ लोकसंख्या अनु जमातीची आहे तसेच अनुसूचित जातीची लोकसंख्या १,०८,८२४ आहे. जिल्ह्याच्या उत्तरेला भंडारा जिल्हा, पूर्वेला छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव आणि बस्तर जिल्हे, दक्षिणेला आंध्र प्रदेशातील करीमनगर आणि आदिलाबाद जिल्हे आणि पश्चिमेला चंद्रपूर जिल्हा आहे. वैनगंगा ही या जिल्ह्याची प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या पश्चिम दिशेकडून वाहते व तिची जिल्ह्याची सीमारेषा आहे.

    जिल्ह्यात गोंडी, माडिया, मराठी, हिंदी, तेलुगू, बंगाली, छत्तीसगढी या सात भाषा बोलल्या जातात.

    या जिल्ह्यात लोह, चुनखडी, अभ्रक याचे साठे विपुल प्रमाणात आहे. वाहतुकीच्या दृष्टीने बारमाही रस्ते उपलब्ध नसल्यामुळे उद्योग धंद्याच्या बाबतीत जिल्हा मागासलेला आहे.

    1. आरमोरी येथे कोसा उद्योग केंद्र आहे. वैरागड येथे ऐतिहासिक किल्ला आहे. भंडारेश्वर व गोरजाईचे हेमांडपंथी देवालय आहे.

    2. जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) येथे एकमेव रेल्वेस्थानक असल्यामुळे ते व्यापाराचे केंद्र बनले आहे. तसेच येथे वाळू माता संगोपन केंद्र आहे. येथे कागद कारखाना देखील आहे.

    3. कुरखेडा येथे गुरांचा मोठी बाजारपेठ आहे. या तालुक्यातील खोब्रामेंधा रमनीय क्षेत्र असून येथे हनुमानाची भव्य मूर्ती आहे.

    4. चामोर्शी तालुक्यातील मार्कंडदेव येथे अतीप्राचीन मार्कंडेश्वर देवालय आहे. या ठिकाण्यावर वैनगंगा नदी उत्तरवाहिनी असून येथे मोठी यात्रा भरते. याच तालुक्यात चपराळा हे ठिकाण प्राणहिता नदीच्या काठावर असून याला प्रशांतधाम असेही म्हणतात. येथे मोठी यात्रा भरते. येथील अभयारण्य प्रसिद्ध आहे. आष्टी येथे कागद कारखाना आहे.

    5. अहेरी तालुक्यातील आलापल्ली परिसरातील वनश्री पाहण्यासारखी आहे. येथील सागाचे लाकूड उत्तम प्रतीचे आहे. वनखात्याचा लाकूडकटाई कारखाना येथे आहे.

    6. एटापल्ली भागात सौर ऊर्जेवरील दिव्यांचा वापर केला जातो. येथे सौर ऊर्जेसाठी स्तंभ उभारण्यात आलेला आहे.

    7. भामरागड तालुक्यात हेमलकसा येथे आदिवासींसाठी लोकबिरादरी केंद्र व आश्रम आहे. आश्रमातील प्राणी संग्रालय पाहण्यासारखे आहे. तसेच पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रवती या नद्यांचे त्रिवेणी संगम आहे.

    जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची धार आहे. या जिल्ह्यामध्ये प्रत्येक लहान गावात विकासाची बोली लावण्यात आली असून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती विविध माध्यमांतून ग्रामीण भागात पोहोचवून योजनांची अंमलबजावणी तीव्रतेने केली जाते ज्यामुळे जिल्ह्याचा विकास होतो.

    या जिल्ह्याचा क्षेत्रफळ १५,४३३.३८ चौ.कि.मी असून त्यापैकी १३,७०८ चौ.कि.मी वना खाली आहे. जिल्ह्याच्या उत्तर दक्षिण सीमेवर वैनगंगाखेऱ्यात मोडतो. जिल्ह्यात १६१३ जिल्हा परिषदेचे माजी मालगुजारी तलाव व १७ लघु पाटबंधारे तलाव १६३० तलाव व ७८८८ सिंचन विहिरी आहेत. सरासरी पर्जन्यमान अधिक असल्यामुळे मुक्यातत्वे करून धानाचे पिक घेण्यात येते. लोखांचे मुक्य व्यवसाय शेती असून मच्छिमारी, तेंदूपाने, गोंद गोळा करणे इत्यादी जोडधंदे आहेत.

    • जिल्हा परिषद: 01

    • एकूण पंचायत समिती : 12

    • जिल्हा परिषद/पंचायत समिती सदस्य : 96/371

    • एकूण शहरे (शहर परिषद) :3

    • एकूण शहरे (नगर पंचायत): 9

    • एकूण ग्रामपंचायती : 467

    • पोलीस स्टेशन : 30

    • पोलीस चौकी 29

    • एकूण गाव: 1680

    • लोकसंख्या

    • लोकसंख्या : 10,72,942 (2011 च्या जनगणनेनुसार)

    • पुरुष: 541328

    • महिला: 531614

    • भौगोलिक

    • जिल्ह्याचे क्षेत्रफळ 14412 चौ. के.एम.

    • भौगोलिक स्थान 18.43 ते 21.50

    • उत्तर अक्षांश, 79.45 ते 80.53 पूर्व

    • अक्षांश उंची – 217 मीटर (715 फूट)

    • तापमान (2019) मि. 11.3 D.C. कमाल 47.7 डी.सी.

    • सरासरी पाऊस (2019) 1430.8 m.m.

    • वनक्षेत्रः 1133009 हे., 75.96 %

    • निव्वळ लागवड क्षेत्र (2017-2018): 195570.29 हेक्टर

    • प्रमुख पिके: भात

    • शिक्षण

    • साक्षरता: 74.04 टक्के

    • प्राथमिक शाळा: 1673

    • माध्यमिक शाळा: 214

    • वरिष्ठ महाविद्यालय : 79

    • टेक्निकल इन्स्टिट्यूट/कॉलेज: 30

    • सार्वजनिक आरोग्य

    • जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल: 01

    • जिल्हा महिला रुग्णालय: 01

    • दवाखाने (ग्रामीण रुग्णालये): 12

    • प्राथमिक आरोग्य केंद्र: 48

    • पशुपालन विभाग

    • पशुवैद्यकीय दवाखाने: 92

    • पशुवैद्यकीय मदत केंद्रे: 39

    • फिरती पशुवैद्यकीय रुग्णालये: 7

    • जिल्हा पॉलीक्लिनिक: 1

    • मिनी पॉलीक्लिनिक: 6

    • अंगणवाडी केंद्र: 1771

    • मिनी अंगणवाडी केंद्र : 516