बंद

    सामान्य प्रशासन विभाग

    विभाग प्रमुखाचे नाव श्री.शेखर माधव शेलार
    पदनाम उप मुख्य कार्यकारी अधिकारी
    दुरध्वनी क्रमांक 07132- 297463
    ई-मेल zpgadmail@gmail.com 
    कक्ष प्रमुखाचे नाव श्री. फिरोज लांजेवार
    पदनाम सहाय्यक प्रशासन अधिकारी 
    दुरध्वनी क्रमांक 8275558067
    ई-मेल zpgadmail@gmail.com 
    • सामान्य प्रशासन विभाग हा जिल्हा परिषदेमध्ये असणा-या एकूण १४ विभागांपैकी एक महत्वाचा विभाग आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) हे या विभागाचे प्रमुख असतात. मुख्यकार्यकारी अधिकारी यांची मान्यता आवश्यक असणा-या जिल्हा परिषदेकडील सर्व खात्यांकडील प्रशासकीय प्रस्ताव-प्रकरणे यांची छाननी करुन सादर करणेचे काम या विभागामार्फत केले जाते.
    • विभागाचे महत्त्वाचे कार्य
    • जिल्हा परिषदेकडे केल्या जाणा-या सर्व नेमणुका पदोन्नत्या, जिल्हा बदल्या, नियतकालीक
      बदल्या, खातेनिहाय चौकशी प्रकरणे, अतिउत्कृष्ट कामाबद्दल कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढी, पुरस्कार, इ.
    • जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा यांचे कामकाज पाहणे.
    • महाराष्ट्र विकास सेवा वर्ग-१ व २ मधील अधिका-यांच्या आस्थापनेचे काम.
    • तालुक्यांतर्गत असणारे गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, महिला व बाल कल्याण, उपविभाग, प्रा. आ. केंद्रे, जनावरांचे दवाखाने, केंद्र शाळा अंगणवाडया यांचेमार्फत राबविणेत येणा-या शासनाच्या वेगवेगळया विकास योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व यशस्वीपणे झाली. आहे किंवा नाही त्याचप्रमाणे प्रशासकीय कामांचा आढावा याची पहाणी करणेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) यांचे मार्फत वार्षिक तपासणी केली जाते.
    • तसेच मुख्यालयातील विभागांचीही वार्षिक तपासणी दुस-या तपासणी पथकामार्फत केली जाते व तपासणीव्दारे आवश्यक असणारे मार्गदर्शन करुन कामामध्ये गतीमानता व सुधारणा करणेचा प्रयत्न केला जातो. या विभागामार्फत समता दिन, दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन, क्रांती दिन, सद्भावना दिवस, संकल्प दिन, एकता सप्ताह, हुतात्मा दिन या बरोबरच प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, कामगार दिन इ. कार्यक्रमांचे आयोजन व अंमलबजावणी यावर नियंत्रण व परिरक्षण केले जाते.
    • जिल्हा परिषदेकडून शासनाच्या आरक्षणविषयक धोरणानुसार ज्या त्या संवर्गातील आरक्षणानुसार पदांची भरती केली जाते किंवा नाही, मागासवर्गीयांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ दिला जातो किंवा नाही त्याचप्रमाणे विकासाच्या योजनांचा लाभ दिला जातो किंवा नाही त्याचप्रमाणे विकासाच्या अन्य योजना ग्रामीण जनतेला देणे कामी जिल्हा परिषदेने काय प्रयत्न केले याबाबतचा आढावा घेणेसाठी पंचायत राज समिती, अनुसूचीत जाती कल्याण समिती, इतर मागासवर्गीय कल्याण समिती, वि. जा. भ. ज. कल्याण समिती, अनुसूचीत जमाती कल्याण समिती, महिला हक्क व बालकल्याण समित्या भेट देतात. समित्यांचे भेटी कार्यक्रमावेळी माहितीचे एकत्रीकरणव सादरीकरण या विभागामार्फत केले जाते. जिल्हा परिषदेमार्फत राबविणेत येत असलेल्या विविध योजना व विकास कामांचा आढावा व मार्गदर्शन करणेसाठी खातेप्रमुख, गट विकास अधिकारी, उप अभियंता, गट शिक्षण अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांची मासिक बैठक आयोजित
      केली जाते.
    • या बैठकीचे नियोजन विभागामार्फत केले जाते. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांची विभागीय स्तर व राज्य स्तरावरील बैठकीसाठी लागणा-या आवश्यक माहितीचे एकत्रीकरणया विभागामार्फत करणेत येते. मा. लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी ज्या वेळी जिल्हयाच्या भेटीकरिता येत असतात, त्यावेळी विकास कामे व आस्थापना विषयक बाबी संदर्भात माहिती या विभागामार्फत दिली जाते.
    • राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता (प्रगती) अभियान दरवर्षी २० ऑगस्ट ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविले जाते. अभियांनांतर्गत कार्यालय सुशोभिकरण, अभिलेख वर्गीकरण, कार्यालयीन वातावरणात सुधारणा व स्वच्छता कार्यपध्दती सुलभीकरण, ई-गव्हर्नन्स खर्चात काटकसर, महसुली उत्पन्न वाढविणे नियमांचे अधिनियमांचे एकत्रीकरण करणे, प्रशासन लोकाभिमुख्य करणे कर्मचा-यांचे  आस्थापना विषयक बाबी अद्यावत करणे इ. बाबी अभियानांतर्गत राबविणेत येतात.
    • सामान्य प्रशासन विभागामार्फत या अभियानाचे नियंत्रण केले जाते. जिल्हा परिषदेत सेवेत नव्याने रुजू झालेल्या व परिचरांमधून पदोन्नतीने वरिष्ठ सहाय्यक व कनिष्ठ सहाय्यक यांना दैनंदिनकामकाजामध्ये उद्भवणा-या अडचणी संदर्भात मार्गदर्शन करणे तसेच राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता अभियान मध्ये ही प्रशासकीय कामकाजात गतीमानता आणण्याच्या दृष्टीने.
    • जिल्हा परिषद सेवेत नव्याने दाखल झालेले कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचे नियोजन व अंमलबजावणी या विभागामार्फत करणेत येते.

    सामान्य प्रशासन विभाग हा जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या एकूण 14 विभागांपैकी एक महत्वाचा विभाग आहे. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) हे या विभागाचे प्रमुख असतात.

    मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मान्यता आवश्यक असणाऱ्या जिल्हा परिषदेकडील सर्व खात्यांकडील प्रशासकीय प्रस्ताव-प्रकरणे यांची छाननी करुन सादर करण्याचे काम या विभागामार्फत केले जाते.

    जिल्हा परिषदेकडे केल्या जाणाऱ्या सर्व नेमणुका पदोन्नत्या , जिल्हा बदल्या, नियतकालीक बदल्या, खाते निहाय चौकशी प्रकरणे, अतिउत्कृष्ट कामाबद्दल कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढी पुरस्कार इ.

    जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा यांचे कामकाज पाहणे.

    महाराष्ट्र विकास सेवा वर्ग-1 व 2 मधील अधिकाऱ्यांच्या आस्थापनेचे काम.
    तालुक्यांतर्गत असणारे गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम / सिंचाई / ग्रा. पा. पु. उपविभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, प्राथमिक शाळा, अंगणवाडया यांचेमार्फतीने राबविणेत येणाऱ्या शासनाच्या वेगवेगळ्या विकास योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व यशस्वीपणे झाली आहे किंवा नाही. त्याचप्रमाणे प्रशासकीय कामांचा आढावा याची पाहणी करेणसाठी.

    मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) यांचे मार्फत वार्षिक तपासणी केली जाते. तसेच मुख्यालयातील विभागांचीही वार्षिक तपासणी दुसऱ्या तपासणी पथकामार्फत केली जाते व तपासणीव्दारे आवश्यक असणारे मार्गदर्शन करुन कामामध्ये गतीमानता व सुधारणा करणेचा प्रयत्न केला जातो.

    या विभागामार्फत समता दिन, दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन, क्रांती दिन, सद्भावना दिवस, संकल्प दिन, एकता सप्ताह, हुतात्मा दिन या बरोबर प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र दिन, कामगार दिन इ. कार्यक्रमांचे आयोजन व अंमलबजावणी यावर नियंत्रण व परिरक्षण केले जाते.

    जिल्हा परिषदेकडून शासनाच्या आरक्षणविषयक धारेणानुसार ज्या त्या संवर्गातील आरक्षणानुसार पदांची भरती केली जाते किंवा नाही, मागासवर्गांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ दिला जातो किंवा नाही, त्याचप्रमाणे विकासाच्या योजनांचा लाभ दिला जातो किंवा नाही, त्याचप्रमाणे विकासाच्या अन्य योजना ग्रामिण जनतेला देणे कामी.

    जिल्हा परिषदेने काय प्रयत्न केले याबाबतचा आढावा घेणेसाठी पंचायत राज समिती, अनुसूचित जाती कल्याण समिती, इतर मागासवर्गीय कल्याण समिती, वि. जा. भ. ज. कल्याण समिती, अनुसूचित जमाती कल्याण समिती, महिला हक्क व बालकल्याण समित्या भेट देतात. समित्यांचे भेटी कार्यक्रमावेळी माहितीचे एकत्रीकरण व सादरीकरण या विभागामार्फतीने केले जाते.

    जिल्हा परिषदेमार्फत राबविणेत येत असलेल्या विविध योजना व विकास कामांचा आढावा व मार्गदर्शन करणेसाठी खातेप्रमुख, गट विकास अधिकारी, उप अभियंता , गट शिक्षणाधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची मासिक बैठक आयोजित केली जाते. या बैठकीचे नियोजन विभागामार्फत केले जाते. तसेच मख्य कार्यकारी अधिकारी यांची विभागीय स्तर व राज्य स्तरावरील बैठकीसाठ लागणाऱ्या आवश्यक माहितीचे एकत्रीकरण या विभागामार्फतीने करणेत येते.

    मा. लोक प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी ज्या वेळी जिल्हयाच्या भेटीकरिता येत असतात, त्यावेळी विकास कामे व आस्थापना विषयक बाबी संदर्भात माहिती या विभागामार्फत दिली जाते. राजीव गांधी प्रसासकीय गतीमानता(प्रगती) अभियान दरवर्षी 20 ऑगस्ट ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत राबविली जाते. अभियानांतर्गत कार्यालय सुशोभिकरण, अभिलेख वर्गीकरण, कार्यायीन वातावरणात सुधारणा व स्वच्छता कार्यपध्दती सुलभीकरण, ई-गव्हर्नन्स, खर्चात काटकसर, महसुली उत्पन्न वाढविणे नियमांचे अधिनियमांचे एकत्रीकरण करणे, प्रशासन लोकाभिमुख करणे, कर्मचाऱ्यांचे आस्थापना विषयक बाबी अद्यावत करणे इत्यादी बाबी अभियांनांतर्गत राबविणेत येतात.

    सामान्य प्रशासन विभागामार्फत या अभियानाचे नियंत्रण केले जाते. जिल्हा परिषदेत सेवेत नव्याने रुजू झालेल्या व परिचारांमधून पदोन्नतीने कनिष्ठ सहाय्यक व कनिष्ठ सहाय्यक यांना दैनंदिन कामकाजामध्ये उद्भवणाऱ्या अडचणी संदर्भात मार्गदर्शन करणे

    तसेच राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता अभियान मध्ये ही प्रशासकीय कामकाजात गतीमानता आणण्याच्या दृष्टिने जिल्हा परिषद सेवेत नव्याने दाखल झालेले कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचे नियोजन व अंमलबजावणी या विभागामार्फत करणेत येते.

     

    अ.क्र. संवर्ग मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे
    1. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (शासकीय पद) 1 1 0
    2. सहाय्यक प्रशासन अधिकारी 1 1 0
    3. कनिष्ठ प्रशासन अधिकारी 3 3 0
    4. विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 1 1 0
    5. टंकलेखक (उच्च श्रेणी) 2 2 0
    6 टंकलेखक (निम्न श्रेणी) 2 1 1
    7 वरिष्ठ सहाय्यक 14 12 2
    कनिष्ठ सहाय्यक 15 13 2
    9 कनिष्ठ सहाय्यक (लेखा) 3 2 1
    10 वाहनचालक 5 5 0
    11 नाईक 0 0 0
    12 परिचर 14 14 0
                                   एकून   60 54 6
    • जिल्हा परिषदेकडे केल्या जाणाऱ्या सर्व नेमणुका पदोन्नत्या , जिल्हा बदल्या, नियतकालीक बदल्या, खाते निहाय चौकशी प्रकरणे, अतिउत्कृष्ट कामाबद्दल कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढी पुरस्कार इ.
    • जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा यांचे कामकाज पाहणे.
    •  महाराष्ट्र विकास सेवा वर्ग-1 व 2 मधील अधिकाऱ्यांच्या आस्थापनेचे काम.
    • प्रशासकीय कामकाजांचा आढाव व नियंत्रण ठेवणे.
    • समित्यांचे भेटी कार्यक्रमावेळी माहितीचे एकत्रीकरण व सादरीकरण करणे.
    •  प्रशासकीय कामकाजात गतीमानता आणण्याच्या दृष्टिने जिल्हा परिषद सेवेत नव्याने दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेणे.
    • प्रशिक्षणाचे नियोजन व अंमलबजावणी करणे.
    • अधिकारी / कर्मचारी यांची आस्थापणा विषयक बाबी
    • कर्मचारी यांची पदभरती करणे
    • अनुकंपा तत्तवावर भरती
    • सेवानिवृत्त कर्मचारी यांची पेंशन अदालत घेणे
    • सेवानिवृत्त कर्मचारी यांना इतर आवश्यक लाभ प्रदान करणे
    • जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांशी समन्वय ठेवणे
    • जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा व स्थायी सभेचे आयोजन करणे
    • जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या संबंधात पदोन्नती करणे
    • कर्मचा-यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ प्रदान करणे
    • माहितीचा अधिकार
    • न्यायालयीन प्रकरणे, विभागीय चौकशी
    • वेतन व भत्ते या व्यतीरिक्त उर्वरीत हस्तांतरीत अभिकरण व अधिग्रहीत योजना/कामे यासंदर्भात जिल्हा परिषदांना उपलब्ध करुन दिलेल्या अंदाजपत्रकीय तरतुदी यांचे रीतसर नियोजन करुन या नियमाप्रमाणेच खर्च करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदांची आहे.
    •  याकरीता महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती लेखासहिता नियम 1968 व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय व मार्गदर्शक सूचना यास अनुसरुन योजना राबविण्याची कार्यवाही करण्यात येते.
    1.  नरेश मारोतराव गुमडेलवार
      सहा. जन माहीती अधिकारी तथा कनिष्ठ प्रशासन अधिकारी
      संपर्क क्रं. 9689734566
    2. श्री एफ. एस. लांजेवार
      जन माहीती अधिकारी तथा सहाय्यक प्रशासन अधिकारी
      संपर्क क्र. 8275558067
    3. श्री शेखर माधव शेलार, प्रथम अपीलीय अधिकारी तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य ) संपर्क क्रं. 9545325111