- केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजना :- बाल्यावस्था हा मुलांच्या वाढीच्या व विकासाच्या टप्प्यातील अंत्यंत महत्वाचा कालावधी आहे. जन्माला येण्यापूर्वी तसेच जन्मानंतर बालकांना पुरेशा सेवा देण्याचे राष्ट्रीय धोरण आपल्या देशाने स्वीकारले आहे.
- या धोरणनुसारच 2 ऑक्टोंबर 1975 साली प्रायोगिक तत्वावर एकात्मिक बाल विकास सेवा योजना मुलांचे सर्वांगीण विकासासाठी म्हणून आरोग्य, आ हार व शिक्षण एकत्रितपणे देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली.
- गरीब कुंटूंबातील महिला आणि मुले यांच्यासाठीचा आणि तळागाळापर्यंत पोहचलेला राज्यभरात 88,272 अंगणवाडी केंद्गे असणारा व ग्रामीण भागात 364 प्रकल्प, 85 आदिवासी प्रकल्प व 104 शहरी प्रकल्प असणारा हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे.
- या कार्यक्रमाखाली
- 1) पूरक पोषण आहार,
- २)आरोग्य तपासणी
- 3)संदर्भ आरोग्य सेवा,
- ४) आरोग्य आणि सकस आहार विषयक शिक्षण
- 5) अनौपचारिक शालेय पुर्व शिक्षण इ. सहा महत्वाच्या सेवा दिल्या जातात.
- एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्ग शासन पुरस्कृत योजना असून ही योजना गडचिरोली जिल्ह्यात सन १९९१ पासुन कार्यान्वित झालेली आहे.
महिला व बाल कल्याण विभाग
|
अ.क्र. | संवर्ग | मंजूरपदे | भरलेलीपदे | रिक्तपदे |
1. | उपमुख्यकार्यकारीअधिकारी (शासकीयपद) | 1 | 1 | 0 |
2. | सहाय्यकप्रशासनअधिकारी | 1 | 1 | 0 |
3. | कनिष्ठप्रशासनअधिकारी | 1 | 1 | 0 |
4. | विस्तारअधिकारी (सांख्यिकी) | 2 | 2 | 0 |
5. | वरिष्ठ सहाय्यक | 1 | 1 | 0 |
6. | कनिष्ठ सहाय्यक | 2 | 2 | 0 |
7. | वरिष्ठ सहाय्यक (लेखा) | 1 | 1 | 0 |
8. | परिचर | 2 | 2 | 0 |
एकुण | 11 | 11 | 0 |
- केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत दारीद्रय रेषेखालील अनु. जाती, अनु. जमाती, जनजमाती मधील सर्व ० ते ६ वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता व १५ ते ४५ वयोगटातील महिला यांचा विविध कार्यक्रमातून लाभार्थी म्हणुन समावेश आहे. योजनेची ठळक उद्दीष्टे खालील प्रमाणे आहेत. ० ते ६ वर्ष वयोगटातील मुलांचा पोषण आहार विषयक दर्जा सुधारणे मुलांना योग्य मानसिक शारीरीक व सामाजीक विकासाचा पाया घालणे. बालमृत्यू , मुलांचा रोगटपणा, कुपोषण व शाळेतील गळती यांचे प्रमाण कमी करणे. मातांना पोषण आहार विषयक शिक्षण देवून मुलांचे सर्वसाधारण आरोग्य आणि पोषण आहार या संबंधी मुलांची अधिक चांगली काळजी घेणे त्यांची क्षमता वाढविणे.
- बाल विकासास चालना मिळावी म्हणुन विविध खात्यांमध्ये धोरण अंमलबजावणी या बाबत प्रभावी समन्वय घडवून आणणे पुरविण्यांत येणाऱ्या सेवा पुरक पोषण आहार, आरोग्य तपासणी, लसिकरण, संदर्भ सेवा, अनौपचारीक पुर्व शालेय शिक्षण पोषण, आरोग्य व आहार शिक्षण इत्यादी कार्यवाही करणे.
१) महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत अनुसूचीत जाती या संवर्गातील मुलींना व महिलांना विशेष घटक योजना (SCP) अंतर्गत तांत्रिक देवून त्यांना स्वयंरोजगार निर्माण करता यावा म्हणुन या योजनेत व्यक्तीमत्व विकास, सौंदर्य प्रसाधन प्रशिक्षण, शिवणकाम प्रशिक्षण व मोटार ड्रायव्हींग प्रशिक्षण, या योजनेत रु. 5,000/- पर्यंत खर्च महिला व बाल कल्याण समिती मार्फत करता येईल. प्रशिक्षण शुल्काच्या 10% रक्कम लाभार्थींनी स्वत: भरावयाची आहे.
२) जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना (TSP) अंतर्गत अनुसूचीत जमाती या संवर्गातील मुलींना व महिलांना तांत्रिक प्रशिक्षण देवून त्यांना स्वयंरोजगार निर्माण करता यावा म्हणुन या योजनेत व्यक्तीमत्व विकास, सौंदर्य प्रसाधन प्रशिक्षण, शिवणकाम प्रशिक्षण व मोटार ड्रायव्हींग प्रशिक्षण, या योजनेत रु. ५०००/- पर्यंत खर्च महिला व बाल कल्याण समिती मार्फत करता येईल. प्रशिक्षण शुल्काच्या १०% रक्कम लाभार्थींनी स्वत: भरावयाची आहे.
३) जिल्हा निधी योजना अंतर्गत महिला मेळावे आयोजित करणे, महिला दिन साजरा करणे, अंगणवाडी केन्द्रांना आवश्यक साहित्य पुरविणे तसेच देसाईगंज तालुक्यातील इयत्ता ०५ ते १२ वी पर्यंतच्या आर्थिक दृष्टया मागासलेल्या मुलींना सायकल वाटप करणे.
४) १३ वने योजना अंतर्गत दशसुत्री बचत गटाच्या महिलांना स्वयंरोजगारासाठी सुविधा पुरविणे/प्रशिक्षण देणे, आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना सौर कंदील पुरविणे तसेच अंगणवाडी केन्द्रांना आवश्यक साहित्य पुरविणे.
५) १० टक्के सेसफंड योजना अंतर्गत जिल्हा परिषद महिला सदस्यांकरीता अभ्यास दौरा आयोजित करणे, अंगणवाडी इमारत दुरूस्त करणे, प्रत्येक तालुक्यात एक आदर्श अंगणवाडी बनविणे. दशसुत्री बचत गटाच्या महिलांना स्वयंरोजगारासाठी तांत्रीक प्रशिक्षण देणे व साहित्य पुरविणे.१२ वी पास मुलींना स्पर्धा परिक्षा करीता प्रशिक्षण देणे.
६) किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर, आरोग्य, कुटुंब नियोजन, कायदेविषयक प्रशिक्षण – शाळा व महाविद्यालयातील किशोरवयीन मुलींचा विकास व सक्षमीकरण, पोषण व आरोग्य विषयक दर्जा सुधारणे त्याचप्रमाणे स्वच्छता, प्रजनन व लैंगीक आरोग्य, कुटुंब व बालकाची काळजी या विषयी किशोरींमध्ये जाणीव व जनजागृती निर्माण व्हावी, जीवनकौशल्य, गृहकौशल्य व व्यवसाय कौशल्य याबाबत किशोरींना मार्गदर्शन, त्यांचा आत्मविश्वास वाढण्याकरीता तसेच त्यांना विविध कायदेविषयक तरतुदींची माहिती मिळावी म्हणुन अंगणवाडी पर्यवेक्षिका, विधी तज्ञ, अनुभवी व संवेदनशिल तज्ञ मार्गदर्शक यांच्यामार्फत प्रशिक्षण शाळा आयोजीत करावयाच्या आहेत यासाठी तज्ञ मार्गदर्शकांना रु. २००/- ते ५००/- पर्यंत मानधन देण्यात येते. योजनेत माता सक्षमीकरण, गरोदर माता, किशोरवयीन मुलींना लसिकरण, माता समिती बैठका व आहार विषयक मार्गदर्शन असे कार्यक्रम आयोजीत करण्यात येते.
बालवाडी व अंगणवाडी सेविका, मदतनिस, पर्यवेक्षिका यांना पुरस्कार देणे – बालवाडी व अंगणवाडींमध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनिस, पर्यवेक्षिका यांना आदर्श पुरस्कार देता येईल. या योजनेसाठी वार्षिक रु. ३.०० लक्ष पर्यंत खर्च करण्यात येते.सन २०२४-२०२५ ची माहिती निरंक आहे.
- एकात्मिक बाल विकास सेवा योजना,प्रकल्प ,तालुका स्तर.
- महाराष्ट्र शासनातर्फे सुरू लेक लाडकी योजना ही ०१ एप्रील २०२३ पासुन मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी योजना ३० ऑक्टोंबर २०२३ चे शासन निर्णयान्वये सुरू करण्यात आली आहे व सदर योजनेची अंमलबजावणी करणेसाठी योजनेचा लाभ खालीलप्रमाणे अटीची पुर्तता करणा-या कुटूंबाना दिले जाते.
- राज्य सरकार :- महाराष्ट्र शासनातर्फे सुरू लेक लाडकी योजना ही ०१ एप्रील २०२३ पासुन मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी योजना ३० ऑक्टोंबर २०२३ चे शासन निर्णयान्वये सुरू करण्यात आली आहे व सदर योजनेची अंमलबजावणी करणेसाठी योजनेचा लाभ खालीलप्रमाणे अटीची पुर्तता करणा-या कुटूंबाना दिले जाते.
- Lek Ladki Yojana 2024: लेक लाडकी योजना 2024 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मुलींना जन्मापासून ते मुलीच्या 18 वर्षे वयापर्यंत एकूण 1 लाख 1 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
योजनेची उद्दिष्टे :
श्रीमती. एस.एस.शेख
सहाय्यक प्रशासन अधिकारी
दुरध्वनी क्रमांक :- ९४२१६६९९३८