पोटेगाव येथील शेतकऱ्यांना दिली कृषी योजनांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : खरिपाचे क्षेत्र मोठ्या
प्रमाणात असून, येथील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजना, तसेच इतर विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषद गडचिरोली येथील कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी केले.
पोटेगाव येथे आयोजित कृषी मेळाव्याचे उद्घाटन किरण खोमणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पोटेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अर्चना सुरपाम होत्या. प्रमुख पाहुणे उपविभागीय कृषी.
अधिकारी डी. वाय. गिन्हेपुंजे, गटविकास अधिकारी अनिकेत एस. पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. बोधीकर व बुद्धेवार, राजोलीच्या सरपंच कांता हलामी, ग्रामपंचायत देवापूरचे सरपंच शिवाजी गावडे, मारदाचे सरपंच नारायण पोटावी, बाजीराव मडावी, विलास खोब्रागडे, कृषी विस्तार अधिकारी डी.जे. ठाकरे, लक्ष्मण पाल, पशुधन विकास अधिकारी डॉ. शिरणकर, ग्रामसभा अध्यक्ष शिवाजी नरोटे उपस्थित होते. संचालन सावेला ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र शिवणकर, प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी प्रल्हाद पदा, तर आभार पंचायत समिती गडचिरोलीचे कृषी अधिकारी कनिषा राजनहीरे यांनी मानले.
पंचायत समिती, गा चिरोली
कृषि मेळावा
कृषी योजनांची माहिती देताना किरण खोमणे, सोबत सरपंच अर्चना सुरपाम
कृषी संयंत्रांसाठी शासनाकडून मिळते अनुदान
मेळाव्यात डी. वाय. गिन्हेपुंजे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली. फळबाग लागवड योजना व त्यासंबंधी शासनाकडून मिळणारे अनुदान याबाबत सखोल माहिती शेतकऱ्यांना दिली. पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अनिकेत पाटील यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले.
तारासाठी करा अर्ज
मेळाव्यात कुंपणासाठी तार, १३ वने आणि ६० टक्के वन महसूल योजना, बोरवेलच्या योजना, फलबाग लागवड योजना व त्यासंबंधी शासनाकडून मिळणारे अनुदान याबाबत सखोल माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली. शेतकऱ्यांना फायदेशीर ठरावे, यासाठी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कृषी विभागाच्या योजनांसाठी पात्र ठरू शकतात. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन मेळाव्यादरम्यान करण्यात आले.