बंद

    पंचायत समिती कोरची

    विभाग प्रमुखाचे नाव श्री.राजेश माधव फाये
    पदनाम गट विकास अधिकारी
    दुरध्वनी क्रमांक 9421729540
    ई-मेल bdo1pskorchi@gmail.com
    कक्ष प्रमुखाचे नाव श्री.
    पदनाम सहाय्यक प्रशासन अधिकारी 
    दुरध्वनी क्रमांक 94..
    ई-मेल bdo1pskorchi@gmail.com 

    कोरची हा तालुका गडचिरोली मुख्यालयापासून 120 कि.मी. अंतरावर उत्तरेस आहे. कोरची तालुक्याची निर्मिती 01 मार्च 1997 ला झालेली असून पंचायत समिती कोरची ची स्थापना दिनांक 17/03/1997 ला झालेली आहे. कोरची तालुका छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असून येथे प्रामुख्याने छत्तीसगडी, मराठी, गोंडी, या बोलीभाषेचा वापर केला जातो. संपूर्ण तालुका हा आदिवासी बहूल डोंगराळ व अतिदुर्गम आहे. तालुक्यामध्ये जांभूळ, सिताफळ ही फळे प्रसिध्द असून त्याची निर्यात लगतच्या राज्यामध्ये व महाराष्ट्राच्या इतर जिल्हयामध्ये केली जाते.  तालुक्याअंतर्गत एकूण 29 गट ग्रामपंचायती असून एकूण 121 महसूली गावे आहेत. व कोरची तालुक्याची एकुण लोकसंख्या 39,040 इतकी आहे.

    कोरची तालुक्यामध्ये टिपागड हे पर्यटन स्थळ पर्वतावर असून गुरूबाबाचे मठ व राजमाता देवीचे मंदिर आहे . पर्वतावर मोठा तलाव आहे. संपूर्ण तालुक्यामध्ये भात प्रमूख पीक असून त्याची लागवड प्रामुख्याने खरीप हंगामामध्ये पारंपारीक पध्दतीने केली जाते. ग्रामपंचायत नवरगांव अंतर्गत मौजा साल्हे येथे एकमेव मध संकलन केंद्र वनहक्क समितीमार्फत सूरू आहे. ग्रामपंचायत सातपुती अंतर्गत मौजा कुमकट येथे दरवर्षी तालुक्यातील 60 गावातील पुजारी एकत्र येऊन राजेश्वरी देवी व इतर देवतांच पुजा करून मोठया मंडईचे (यात्रेचे) आयोजन केले जाते.

    केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या ग्रामपंचायत स्तरावरील सर्व योजनांचे एकत्रीकरण करणे, त्यांचे मुल्यांकण करणे, निधी मिळवणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे,तसेच तालुकास्तरावरील समस्यांचे समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांना प्राधान्य देणे.पंचायत समिती कोरची येथील प्रमुख हा राज्य शासनाचा वर्ग -1 अधिकारी असतो त्यांचे पद गट विकास अधिकारी आहे.याशिवाय वर्ग -2 अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून काम करतात. याशिवाय पंचायत समिती स्तरावर विविध विभाग असून सर्व विभागामध्ये प्रशासकीय याशिवाय पंचायत समिती स्तरावर विविध विभाग असून सर्व विभागामध्ये प्रशासकीय कामे केली जातात.

     

    ग्रामीण भागातील सर्व कुटुंबाना केंद्र शासन पुरस्कृत व राज्य शासकीय सर्व योजनांचा लाभ देऊन ग्रामपंचायतीमार्फत ग्रामीण भागातील लोकांचा जीवनस्तर उंचावणे.

    केंद्र शासन पुरस्कृत व राज्य शासन स्तरावरील सर्वांसाठी घरे अंतर्गत ग्रामीण कुटुंबातील आदिवासी, अनु. जाती, व इतर प्रवर्गातील पात्र लोकांना घरकुल योजनांचा लाभ देणे, तालुक्यातील सर्व गावे, वाडया, वस्तयामध्ये पाणीपुरवठा योजना कार्यन्वीत करून सर्व कुटुंबांना पिण्याच्या पाण्याकरीता शुध्द व शाश्वत पाणी उपलब्ध करून देणे.

    केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय पंचायती राज दिवस पेसा अंतर्गत पंचायत समिती कोरची ला सन 2010-2011  ला पंचायती सशक्तीकरण पुरस्कार प्राप्त.

    महाआवास अभियान सन 2020-21 करीता जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ठ तालुका म्हणून सन्मानचिन्ह प्राप्त.

    जिल्हा परिषद गडचिरोली

    सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण)

    प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय गडचिरोली

     

    तालुका स्तरावरील कार्यालये

    अ. उपविभागीय अभियंता, जि. प. (बांध) उपविभाग कोरची

    ब. बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजना कार्यालय कोरची

    क. तालुका आरोग्‍य अधिकारी, कार्यालय कोरची

    1)प्राथमिक आरोग्य केंद्र बोटेकसा

    2)प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगुल

    ड. उपविभागीय अभियंता, जि. प. (ग्रा.पा.पु.) उपविभाग कोरची

    इ) जिल्हा परिषद हायस्कूल बेडगांव

    आयुक्त कार्यालय, नागपूर विभाग, नागपूर

    सेवा 

    1. पंचायत समिती अंतर्गत सर्व ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना जन्म व मृत्यूचे दाखले पुरविणे.

          2. पंचायत समितीमार्फत कोतवाल पंजीची सत्याप्रती नागरिकांच्या मागणीनूसार पुरविणे.

    फॉर्म

         आदिवासी, अनु. जाती, व इतर प्रवर्गातील नागरिकांना राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्गत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना अंतर्गत        फॉर्म भरूण घेऊन त्यांचे घरकुलाचे लाभ मंजूर करणे.

    राज्य सरकार

    केंद्र पुरस्कृत योजना

    1. प्रधानमंत्री आवास योजना
    2. हर घर जल योजना
    3. प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना
    4. मानव विकास मिशन योजना
    5. 15 वा वित्त आयोग योजना
    6. जननी सुरक्षा योजना
    7. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना
    8. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना

     

    राज्य पुरस्कृत योजना

    1. अनुसूचित जाती नवबौध्द घटकांसाठी रमाई आवास योजना
    2. अनुसूचित जमाती करीता शबरी आवास योजना
    3. इतर मागास प्रवर्ग करीता मोदी आवास योजना
    4. वसंतराव नाईक तांडा आवास योजना
    5. आदिवासी मातृत्व योजना
    6. वृध्द कलावंत योजना
    7. सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना
    8. मोफत गणवेश योजना
    9. मोफत पाठपुस्तक योजना

    केंद्र सरकार :-  प्रधानमंत्री आवास योजना व हर घर जल योजना

    पंचायत समिती अंतर्गत एकूण 29 ग्रामपंचायती असून सर्व ग्रामपंचायती गट ग्रामपंचायत आहेत. एकूण जिल्हा परिषदेच्या शाळा 113 असून खाजगी शाळा 16 व जिल्हा परिषदेचे हायस्कूल एक आहे. शासकीय आश्रमशाळा 4 व खाजगी आश्रमशाळा 1 आहेत.  पशुचिकीत्सालय 7 आहेत.  ठराव क्रमांक 24/02 दिनांक 25.07.2024 अन्वये वार्षीक प्रशासन अहवाल जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभाग येथे सादर केला आहे.

    पंचायत समिती कोरची अंतर्गत बजेट सन 2024-25 ची माहिती खालीलप्रमाणे आहे.

     

    अ.क्र. योजनेचे नांव सन2024-25 चे सुधारीत अंदाजपत्रक सन 2025 -26 चे मूळ अंदाजपत्रक

    1.

     

    3 – शिक्षण

    पंचायत समिती अंतर्गत क्रिडा संम्मेलन

    निरंक निरंक
      एकूण निरंक निरंक
    2.

    8 – सार्वजनिक आरोग्य

    ग्रामपंचायतला 50% अनुदानावर ब्लीचींग पावडर पुरविणे

    5000/- 2000/-
      रोग निदान शिबिर आयोजित करणे  
      एकूण 5000/- 2000/-
    3.

    11 – कृषि

    1.   50% अनुदानावर पी.व्ही.सी.पाईप पुरविणे.

    2.   50% अनुदानावर शेतक-यांना कृषि अवजारे पुरविणे (हायटेकस्प्रंपप)

    3.   100% अनुदानावर  शेतक-यांना शैक्षणिक अभ्यास दौरा आयोजीत करणे

    4.   50% अनुदानावर शेतक-यांना ताडपत्री पुरविणे.

    5.   मोटार पंप 50%अनुदानावर शेतक-यांना पुरविणे

    निरंक निरंक
      एकूण निरंक निरंक
    4.

    12 – पशुसंवर्धन

    1.   पशुउपचार शिबीर ओयाजित करणे

    2.   पशुवैद्यकिय दवाखान्यासाठी जिवनरक्षक औषधी पुरविणे

    निरंक निरंक
      एकूण निरंक निरंक
    5.

    14  समाज कल्याण

    1.   अनु.जाती/जमाती व मागासवर्गीयांना 100% अनुदानावर सौरपथदिवे पुरविणे.

    2.   अनु.जाती/जमाती व मागासवर्गीयांना 90% अनुदानावर सायकली    पुरविणे

     

    8000/-

     

    निरंक

     

    2000/-

     

    निरंक

      एकूण 8000/- 2000/-
      अपंग कल्याण 5 टक्के लाभार्थ्यांना साहित्य पूरविणे 2000/- 2000/-
           
      एकूण 2000/- 2000/-
    6 1.  90 टक्केअनुदानावर अंधअपंगाना सायकल पुरविणे निरंक निरंक
      एकूण निरंक निरंक
    7

    18 – संर्किर्ण (महिला बाल कल्याण)

    1.   अंगणवाडयांना खेळणी साहित्य पुरविणे.

    2.   90 टक्के अनुदानावर 10 वी व 12 वी पास विद्यार्थ्यांना मुलिंना सगंणक प्रशिक्षण देणे.

    3.   सायकल पुरविणे

     

    3074/-

     0

     

     

    2000/-

    0

      एकुण 3074/- 2000/-
    8.

    20 संकिर्ण

    1.   सरपंच/सचिव/पदाधिकारी यांचे संम्मेलन आयोजीत करणे.

    2.   पंचायत समिती मासिक सभा व्यवस्थापन खर्च

    3.   ईगव्हणर  कार्यालयात तंत्रज्ञान सुविधा पुरविणे

     

    0

     

    1000

     

     

     

    2000

      एकूण 1000/- 2000/-
      एकूण 19074/- 10000/-