1. केंद्र पुरस्कृत योजनाची राज्यात प्रभावी अंबलबाजवणी व्हावी याकरिता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या संस्थेची स्थापना रजिस्ट्रेशन ऑफ सोसायटी अॅक्ट 1860 व मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950,अन्वये करण्यात आलेली आहे. योजनांची प्रभावी अंबलबाजवणी व्हावी करिता शासन निर्णय क्र. जिग्राप-1121 प्र.क.43/ योजना-5, मंत्रालयमुंबई -400 001 दि. 1 एप्रिल 2022 अन्वये नवीन आकृतीबंध लागु करण्यात आलेला आहे. दारिद्र्य विरोधी कार्यक्रमांचे व्यवस्थापन तसेच दारिद्र्य रेषेखालील व्यक्ति आणि कुटुंब यांचेजीवनमान उंचवण्याकरिता विविध योजनाची अंबलबजवणी करण्यास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सक्षम आहे.
2. राज्यातील ग्रामीण भागातील गरीबीचे निर्मुलन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोंनती अभियानाची सुरुवात सन २०११ मध्ये केली.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दिनांक १८ जुलै २०११ रोजी सविस्तर शासन निर्णय निर्गमित केला.