बंद

    गृह प्रसूतीत जिल्ह्यात 50 टक्के घट

    प्रकाशित तारीख: फेब्रुवारी 26, 2025
    गृह प्रसूतीत जिल्ह्यात 50 टक्के घट

     

     

     

     

     

     

     

     

    पुण्य नगरी / खूप

    गरोदर मतांची प्रसूती आरोग्य संस्तेमध्येच करा : आयुषी सिंह

    गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजनेअंतर्गत गर्भवती मातांचे रक्त, लघवी, रक्तदाब, हिमोग्लोबीन, अल्ट्रासाऊंड आदी तपासण्या तज्ञांकडून केल्या जातात व त्यानुसार वैद्यकीय सल्ला दिला जातो. या सुविधेचा लाभजिल्ह्यातील गरोदर मातांनी घ्यावा तसेच माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर मातांची प्रसूती घरी न करता आरोग्य संस्थेमध्येच करण्याचे आवाहन आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुपी सिंह यांनी केले आहे.

    सन २०२४-२५ मध्ये (एप्रिल ते ऑगस्टपर्यंत) ५ हजार ३५३ प्रसुती आरोग्य संस्थेत करण्यात आलेल्या आहेत. तर ५७ प्रसूती घरी झाल्या आहेत. तसेच मागील वर्षी याच कालावधीत (एप्रिल २३ ते ऑगस्ट २३ पर्यंत) संस्थात्मक प्रसूती ५ हजार ९१६ तर घरी झालेल्या प्रसुतीची संख्या १०२ होती. १ एप्रिल २०२२ ते २१ मार्च २०२४ संस्थात्मक प्रसूती १५ हजार ७५६ तर घरी प्रसूती ३०१ होती. एप्रिल ते ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीची तुलना केली चालू सहामाहीत असता संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वाढलेले असून घरी होणाऱ्या प्रसुतीचे प्रमाण ५० टक्क्यानी कमी करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. आरोग्य विभागअंतर्गत ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३३ प्राथमिक आरोग्य पथक, १२ शहरी आरोग्यमंदिर, २ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, ३७६ उपकेंद्र, ३ उपजिल्हा रुग्णालय, ९ ग्रामीण रुग्णालय, १ सामान्य रुग्णालय व १ त्री रुग्णालय कार्यान्वित आहेत. जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना.

    योजना, मातृत्व अनुदान योजना व मानव विकास मिशनअंतर्गत गरोदर मातांना बुडीत मजुरी अनुदान व तज्ञाचे मार्फतीने गरोदर माता व ० ते ६ महिने वयोगटातील बालकाची आरोग्य तपासणी प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वाढवणेसाठी गरोदर माता ट्रॅकींग, नियंत्रण कक्ष, माता बैठक, माहेरघर योजना, गृहभेट हा पंचसूत्री कार्यक्रम राबविला जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी कळविले आहे.

    गृह प्रसूतीत जिल्ह्यात 50 टक्के घट